उत्तर भारतीय माणूस मुंबई-महाराष्ट्र चालवतो, त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र ठप्प होईल, असं विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केल्यानंतर आता यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी निरुपम यांच्या विधानाचा ट्विटरद्वारे समाचार घेतला. संजय निरुपम यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन मराठी माणसाची चिंता करु नये… संजय निरुपमला कुत्रा चावला किंवा निरुपम कुत्र्याला चावला…निरुपमला जेवण देणारी बायको (सौ. गीता वैद्य-निरुपम) मराठी आहेत, भिकारडा विसरला वाटतं, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.


 
उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सक्रीय आहेत. हीच माणसं पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं तर सर्वकाही ठप्प होऊ शकतं. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, असं वादग्रस्त वक्तव्य निरुपम यांनी केलं होतं. या विधानावरुन यापूर्वीच मनसेने निरुपम यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संजय निरुपम हा कुत्रा आहे. आधी त्याला महाराष्ट्रातून बाहेर काढले पाहिजे. ती घाण असून मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये भांडण लावायचं काम ते करतात. महाराष्ट्रातील लोकांनी आधी एकत्र येऊन निरुपमला ठेचले पाहिजे. याच्यामुळेच उत्तर भारतीय लोकं असे घाणेरडे कृत्य करतात, अशा लोकांना संजय निरुपमच पाठिशी घालतो, अशी टीका ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली.

नागपूरमधील उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी एक विधान केले होते. उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूस करतो. त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल, असे त्यांनी म्हटले होते.