महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. याआधी निलेश राणे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेब ठाकरेंना जबाबदार ठरवलं होतं. तसंच सोनू निगमच्याही हत्येचा कट रचला होता असा आरोप करुन खळबळ माजवली होती.
‘आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का. तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवीन. आमच्या नादाला लागायचं नाही. ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढू. मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय व्हायचं आम्हाला माहिती आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाहीत’, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचला होता; निलेश राणेंचे बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप
‘बाळासाहेब ठाकरेंनी रचला होता सोनू निगमच्या हत्येचा कट’
‘मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल. शिवसैनिक चवताळतील, अंगावर येतील. पण हे साले सगळे हिजडे निघाले. एकाच्यातही दम नाही’, अशा शेलक्या शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली. शिवसैनिकांनाही खऱं काय आहे हे माहिती आहे. निलेश राणे तेव्हा अर्धवटच बोलला होता. पण एक फाईट वातावरण टाइट झालं की नाही असंही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 11:37 pm