15 July 2020

News Flash

‘निसर्ग’ वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं

(संग्रहित छायाचित्र)

अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

“चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तयारी असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं”, असे पवार म्हणाले.

दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज (दि.३) ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 10:58 am

Web Title: nisarga cyclone deputy cm ajit pawar asks people not to go outside sas 89
Next Stories
1 करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेकरच निरुत्साही-बच्चू कडू
2 काही तासांत अलिबाग किनाऱ्यावर धडकणार ‘निसर्ग’ चक्रीवादळ
3 ‘नमस्ते ट्रम्प’साठी आले होते, तेव्हा कानावर पडलं असावं -जितेंद्र आव्हाड
Just Now!
X