04 March 2021

News Flash

मुंबईत NDRF च्या आठ, नौदलाच्या पाच तुकडया तैनात

मुंबईतील ३५ शाळांमध्ये तात्पुरती निवारा केंद्राची व्यवस्था

एअर फोर्सच्या विमानाने आंध्र प्रदेश विजयवाडा येथून मुंबईत दाखल झालेले एनडीआरएफचे पथक

निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

– आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

– मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या आठ आणि नौदलाच्या पाच तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, बोरीवली या भागात प्रत्येकी एक आणि अंधेरीत तीन तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

– किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबईतील ३५ शाळांमध्ये तात्पुरती निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:11 pm

Web Title: nisarga cyclone mumbai fire brigade has been directed to stay alert dmp 82
Next Stories
1 निसर्गमुळे मुंबई-ठाण्यात ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणार वारे
2 रत्नागिरी- भगवती बंदरात अजस्त्र लाटांमध्ये जहाज भरकटले, खलाशी अडकल्याची भीती
3 ‘निसर्ग’ वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
Just Now!
X