News Flash

निसर्गमुळे मुंबई-ठाण्यात ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणार वारे

समुद्राला भरती आली आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ वेगाने पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. किनाऱ्याकडे येताना या चक्रीवादळाचा वेग वाढत चालला आहे.

दुपारी एक ते चारच्या दरम्यान अलिबाग, मुरुड आणि दमन या भागांना वादळाचा तडाख बसणार आहे. हे वादळ धडकल्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाटयाचे वारे वाहील. भारतीय हवामान विभागाचे डीजीएम मृत्यूंजय मोहापात्रा यांनी ही माहिती दिली.

मध्यरात्रीनंतर या वादळाचा वेग कमी होत जाईल असे त्यांनी सांगितले. मुंबईत समुद्र किनाऱ्यांवर सोसाटयाचा वारा वाहत असून समुद्रही खवळला आहे. समुद्राला भरती आली आहे. मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावरचा हा व्हिडीओ आहे.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. यात अलिबाग तालुक्यातील ४ हजार ४०७, पेण मधील ८७, मुरुड मधील २४०७, उरण मधील १५१२, श्रीवर्धन मधील २५५३ म्हसळ्यातील २३९ लोकांचा समावेश आहे. अलिबाग, थळ, नवगाव येथील कोळीवाड्यातून नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 11:50 am

Web Title: nisarga cyclone strong winds of 100 120 kmph over mumbaithane raigad dmp 82
Next Stories
1 रत्नागिरी- भगवती बंदरात अजस्त्र लाटांमध्ये जहाज भरकटले, खलाशी अडकल्याची भीती
2 ‘निसर्ग’ वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
3 करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेकरच निरुत्साही-बच्चू कडू
Just Now!
X