News Flash

शिवसेना आता सेक्युलर, मर्द असाल तर सांगून टाका! नितेश राणेंचं थेट आव्हान

नितेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजाची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने सोमवार सकाळपासूनच भाजपाने टीकेची झोड उठवली. आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करुन शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले आहेत नितेश राणे?
“अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता सेक्युलर झाली आहे. नाहीतर हो मी नामर्द आहे असं तरी?” असे शब्द वापरत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सोमवारी सकाळपासूनच शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपाने निशाणा साधला आहे. अजान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं उदाहरण देत शिवसेनेला आता बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विसर पडला आहे असा आरोप करत प्रवीण दरेकरांनी टीका केली. तर ओवेसींनीही लाजवेल अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

काय म्हणाले पांडुरंग सकपाळ?
दरम्यान शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाला पांडुरंग सकपाळ यांनी उत्तर दिलं आहे. राजकारण करणाऱ्यांना राजकारणच करायचं असतं. आम्ही कोणताही शब्द वापरला तरीही ते राजकारणच करतात. हिंदू-मुस्लिम प्रश्नावर राजकारण करण्याची त्यांची जुनी सवय आहे. ही सवय जाणार नाही. मात्र आमचा हेतू शुद्ध आहे असं सकपाळ यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 10:10 pm

Web Title: nitesh rane attackd on uddhav thackeray over shivsena azan competition scj 81
Next Stories
1 शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले..
2 महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव; काँग्रेसचा योगींच्या दौऱ्यावर आक्षेप
3 महाराष्ट्रात दिवसभरात करोनाचे ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण, ८० मृत्यूंची नोंद
Just Now!
X