काही दिवसांपूर्वी श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या नेत्यांना थेट आव्हान दिले होते. अणेंच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी अणे यांचे छायाचित्र असलेला केक कापला. आम्ही अणेंचे वेगळ्या विदर्भाचे स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार नाही, असा इशारा नितेश यांनी दिला. अणे महाराष्ट्राचा केक कापून खुश होत असतील तर आम्ही पण अखंड महाराष्ट्रासाठी काहीपण कापण्यासाठी तयार आहोत, असे नितेश राणेंनी सांगितले होते.
विदर्भाचा केक कापून अणेंचे राज यांना प्रत्युत्तर 
अ‍ॅड. श्रीहरी अणे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांच्या वाढदिवसाला केक कापण्यात आला होता. केकची प्रतिकृती महाराष्ट्राच्या आकाराची होती, त्यावर मराठवाडा आणि विदर्भ असे वेगवेगळे भाग दर्शविण्यात आले होते. अणे यांनी या केकमधून विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग वेगळे करून आपला जन्म दिवस साजरा केला. मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध करताना महाराष्ट्र म्हणजे केक वाटला काय? की ज्याचे हवे तितके तुकडे करावे? असा सवाल करीत महाराष्ट्राचे चार तुकडे करा, अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत मा.गो वैद्य यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अ‍ॅड. अणे यांनी केक कापूनच प्रत्युत्तर दिले होते.