News Flash

शादी डॉट कॉम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा सरदेसाईंना टोला

"सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का?"

आमदार नितेश राणे.

भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. सचिन वाझे यांना अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्या संबंध असल्याचा आरोप केला. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई यांनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत टीका केली होती. तसेच आपण सुसंस्कृत घरातून असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्विट करत लग्नासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा टोला लगावला आहे.

सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांचे संबंध होते. दोघांच्या मोबाईलवरील संभाषणाची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्वतःची शैक्षणिक व कौटुबिक पार्श्वभूमी सांगितली होती. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

आणखी वाचा- …तर आम्ही शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढू; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना इशारा

“डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच त्याने आपली व कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा,” असा टोला लगावला आहे.

ट्विटबरोबरच पत्रकार परिषदेतूनही राणे यांनी वरूण सरदेसाईंवर टीका केली होती. लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? असं राणे म्हणाले. “सचिन वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढलं नाही. मी बोललो ते खरं की खोटं, याबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का?,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- सचिन वाझे प्रकरण : ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

“आम्हाला शिवसेनेची अंडीपिल्ली माहितीये”

सरदेसाई यांच्या न्यायालयात खेचण्याच्या इशाऱ्याला उत्तर देताना आपणही शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढायची का? ही माहिती बाहेर आली, तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही,” असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 2:22 pm

Web Title: nitesh rane slams varun sardesai in sachin vaze arrest case bmh 90
Next Stories
1 सचिन वाझे प्रकरण : ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार
2 …तर आम्ही शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढू; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना इशारा
3 “नाईट कर्फ्यू, लॉकडाउन संसर्ग रोखण्यात फारसा परिणामकारक नाही”
Just Now!
X