02 December 2020

News Flash

‘टाचणी’ तयार आहे, फक्त योग्य वेळ येऊन द्या; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर टीका

मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून आमदार नितेश राणे यांनी “जास्तच हवा भरलेली आज,” असं म्हणत टोला लगावला आहे.

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांसह नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे व नितेश राणे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर भाष्य केलं. ठाकरे यांच्या भाषणानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका करत इशारा दिला आहे.

“बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज. किती आव. ‘टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

राणेंबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

“प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 9:56 pm

Web Title: nitesh rane uddhav thackeray shivsena dasara melava narayan rane bmh 90
Next Stories
1 पंतप्रधानांनी प्रामाणिकपणे चूक मान्य करून सुधारणा करावी -उद्धव ठाकरे
2 रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप भाडोत्री नाही; उद्धव ठाकरेंचे फटकारे
3 काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्यावं; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला
Just Now!
X