16 October 2019

News Flash

अहमदनगरमध्ये मंचावर नितीन गडकरींना भोवळ

मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले असून डॉक्टरांकडून गडकरींची तपासणी सुरू आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले असून डॉक्टरांकडून गडकरींची तपासणी करण्यात आली. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.

अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांकडून नितीन गडकरी यांची तपासणी सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शुक्रवारी नितीन गडकरी हे हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. तिथून ते राहुरीतील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आली. नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला होता. नितीन गडकरी हे सध्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत. गडकरींसोबत राज्यपाल, पालकमंत्री राम शिंदे हे देखील आहेत.

First Published on December 7, 2018 12:48 pm

Web Title: nitin gadkari faint on stage during national anthem in ahmednagar