कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिरासह मावळ तालुक्यात ३७ अनधिकृत असली तरी ती सरसकट पाडली जाणार नाहीत, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केले. हे प्रकरण उच्च न्यायालयात असून न्यायालयाच्या निर्देशानुसार पावले टाकली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकाम हे नियमानुसार नियमित करता येते, स्थलांतरित करता येते, ते सरसकट पाडून टाकलेच पाहिजे, असे नाही. त्यामुळे या ३७ प्रार्थनास्थळांना नियमित करता येईल. चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे खडसे यांनी सांगितले.