News Flash

वाहन नसल्यामुळे बालकाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू

जव्हार तालुक्यातील धक्कादायक घटना

– विजय राऊत

जव्हार तालुक्यातील शेवटच्या टोकाचे पिंपळशेत खरोंडापैकी हुंबरणा येथील कल्पना राजू गवते या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, मात्र वेळेवर वाहन किंवा अँबुलन्स उपलब्ध न झाल्यामुळे व गावापासून मुख्यरस्त्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

मातेला अचानक प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या, मात्र हुंबरणा पासून जवळ असलेले किनव्हली गावापर्यंत कुठलेही वाहन उपलब्ध झाले नाही. अँबुलन्स सुध्दा मिळाली नाही, अशा परिस्थितीत डोली करून नेणेही शक्य नव्हते, त्यामुळे कल्पनाचा पती पायी किन्हवली गावात पोहचला परंतु तेथेही कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते, तो पुन्हा घरी आला आणि गावकऱ्यांनी तिला कसंबसं डोली करून गाडी पोहचेल अशा ठिकाणी काही किलोमीटर डोली करून आणले, मात्र यात खूप वेळ निघून गेला होता. या प्रवासात महिलेची जंगलातचं प्रसुती झाली, परंतू योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा येथील हुंबरणा हे गाव शेवटच्या टोकाला असल्यामुळे तेथे आजही रस्ता नाही, हा गाव अतिदुर्गम व डोंगराळ भागात आहे, येथे दळणवळणाची व्यवस्थित सोय नाही, आरोग्य सेवाही मिळत नाही, त्यामुळे याभागात सुविधेअभावी दुर्दैवी घटना घडत आहेत, मात्र याभागात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

देश स्वतंत्र होऊन गेली ७४ वर्ष होऊन देखील असा घटना घडतात, ह्या पेक्षा अजून दुर्दैव काय आहे?? ह्या कडे प्रशासनाने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे हिच अपेक्षा आहे.

  • प्रदीप कामडी, सामाजिक कार्यकता

मला या बाबत आताच फोन वरून माहिती मिळाली आहे, याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन घटनेची माहिती घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करणार आहे.

  • डॉ.किरण पाटील,तालुका आरोग्य, अधिकारी,जव्हार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 10:22 am

Web Title: no availability of ambulance and vehicle leads to death of pregnant leady new born child psd 91
Next Stories
1 मावशीच्या नवऱ्याचं लाजिरवाणं कृत्य; लॉकडाउनच्या काळात अल्पवयीन भाचीवर केला वारंवार बलात्कार
2 संजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज
3 “तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे”
Just Now!
X