07 August 2020

News Flash

काही लोक महाविकास आघाडीत वाद होण्याची वाट बघत आहेत -बाळासाहेब थोरात

वाहन खरेदीसंदर्भातलं वृत्त अर्धवट माहितीच्या आधारावर

संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीनं नगरसेवक फोडल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होत. मात्र, यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं वृत्त राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावलं आहे.

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपत असून तीन महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नगरपंचायतीच्या डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधारे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच नगरसेवकांसह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख उमा बोरुडे, उद्योजक सहदेव तड्ढहाळ, शैलेश औटी आदींनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आणखी वाचा- अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर

त्यानंतर शिवसेनेनं यावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. “महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत,” असं थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- “अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले असं नाही…;” त्या प्रकरणावर संजय राऊताचं उत्तर

शिक्षण मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या प्रकरणावरही थोरात यांनी भाष्य केलं. “वाहन खरेदीची वृत्त पूर्ण माहितीच्या आधारावर देण्यात आलेलं नाही. सहा वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. पण, एक वाहन खरेदीचाच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असं थोरात म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 11:37 am

Web Title: no bickering in maharashtra govt congress leader balasaheb thorat bmh 90
Next Stories
1 मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
2 ठाकरे सरकारला धक्का, अंतिम वर्षाच्या परीक्षा ‘या’ महिन्यात होणार; UGC च्या सूचना जारी
3 पालघर जिल्ह्य़ाचे आरोग्य डळमळीत
Just Now!
X