News Flash

लशीच्या दुसऱ्या मात्रेनंतर २८ दिवस रक्तदान नको

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेची सूचना 

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेची सूचना 

पुणे : करोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान न करण्याची सूचना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने के ली आहे. त्यामुळे लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांनी पहिल्या डोसनंतर तब्बल दोन महिने रक्तदान न करणे योग्य ठरणार आहे.

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. सीरम इन्स्टिटय़ूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशी वापरून देशात लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य सेवक, दुसऱ्या टप्प्यात सर्व क्षेत्रातील आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झाले. त्यापाठोपाठ एक मार्चपासून साठ वर्षांवरील सर्व नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयाचे सहव्याधीग्रस्त नागरिक यांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात मोठय़ा प्रमाणावर लसीकरण होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ही सूचना के ली आहे.

के ंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध के ले आहे. लसीकरणाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नागरिकांनी २८ दिवसांच्या अंतराने लशीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडय़ांनंतर मानवी शरीरात करोना प्रतिपिंडांची निर्मिती पूर्ण होते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

येणाऱ्या स्वयंसेवकाने लस घेतलेली नाही याची माहिती घेऊनच आम्ही रक्तदानाची प्रक्रिया सुरू करतो. दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर २८ दिवसांनीच नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन करतो. त्यामुळे या सूचनेची अंमलबजावणी आमच्या स्तरावर आम्ही करत आहोत.

– राम बांगड, प्रमुख संस्थापक, रक्ताचे नाते ट्रस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:16 am

Web Title: no blood donation for 28 days after the second dose of vaccine zws 70
Next Stories
1 राज्यसेवा परीक्षेत ३० टक्के उमेदवार अनुपस्थित
2 गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? जयंत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
3 Coronavirus – चिंताजनक: दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू, ३० हजार ५३५ करोनाबाधित वाढले
Just Now!
X