महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी समूह संसर्ग सुरू  झालेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे सांगितले. राज्यात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्नाटक, केरळ, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात करोना संसर्ग वाढला आहे.  करोनाप्रतिबंधक उपाययोजनांनंतरही वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी केला होता.