प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला : करोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात होमिओपॅथीचा वापर होत असला तरी प्रत्यक्ष उपचारात त्याला बेदखल करण्यात आले आहे. संसर्ग आजार रोखण्यासाठी होमिओपॅथी उपयुक्त असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. शासनानेही उपचारात होमिओपॅथीसह आयुर्वेद, युनानीचा वापर होण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून करोनाबाधित रुग्णांवर केवळ अ‍ॅलोपथीद्वारेच उपचार सुरू आहेत.

करोना महामारीच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीचे महत्त्व अनेक प्रयोगातून अधोरेखित झाले. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या होमिओपॅथीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. आयुष मंत्रालयाद्वारा जानेवारीमध्ये निर्देश दिले होते. करोना संसर्गजन्य आजाराच्या पाश्र्वाभूमीवर इतर पॅथीच्या चिकित्सा पद्धतीच्या अवलंबावर सूचना देण्यासाठी राज्यात ‘टास्क फोर्स ऑन आयुष फोर कोविड-१९’ गठीत करण्यात आला. या समितीने आयुष मंत्रालयाच्या सूचनांच्या आधारावर राज्यात आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना ८ जूनला निर्गमित केल्या आहेत.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Maratha Reservation Refusal to grant urgent interim injunction to anti-reservation petitioners
मराठा आरक्षण : आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना तातडीचा अंतरिम आदेश देण्यास नकार
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
career options after 10th and 12th career opportunities after 10th and 12th
स्कॉलरशीप फेलोशीप : करिअर मॅपिंग आताच सुरू करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘अर्सेनिकम अल्बम-३०’ औषधांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ब्रायोनिया अल्बा, हस टॉक्सीको हेन्ड्रान, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम परफॉलिएटम ही औषधे देखील सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये चिकित्सेसासाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले. करोनाबाधित अलाक्षणिक, चिकित्सालयीन तपासण्ीनुसार स्थिर असणाºया व इतर गंभीर वर्तमान व्याधी असणाºया रुग्णांसाठी प्रस्थापित उपचाराला होमिओपॅथी पुरक ठरू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई येथे जसवंत पाटील यांनी करोनाबाधित रुग्णांवर होमिओपॅथीद्वारे उपचार केले. त्याचे सकारात्मक परिणामही मिळाले. त्याच धर्तीवर इतर ठिकाणी सुद्धा होमिओपॅथीचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र, करोनाबाधितांवर प्रत्यक्ष उपचारात होमिओपॅथीला स्थानच देण्यात आले नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. समितीने शिफारस केलेल्या होमिओपॅथी औषधांचा वापरच होत नाही. करोना सारख्या संसर्गजन्य आजारावर होमिओपॅथीचे उपचार प्रभावी ठरू शकतात, असा दावा तज्ज्ञांचा आहे. केंद्र व राज्य शासनाने सूचवल्यानंतरही स्थानिक स्तरावर होमिओपॅथी औषधोपचाराला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.

‘त्या’औषधाच्या वाटपावर नियंत्रणाची गरज
केंद्रीय आयुष मंत्रालयाने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये होमिओपॅथीचे ‘अर्सेनिकम अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट केल्यावर त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक ठिकाणी तर त्याची टंचाई देखील निर्माण झाली. या औषधाचा वापर करून त्याच्या गोळ्या सर्वच स्तरावर वाटप करण्यात आल्या. याला कुठलेही नियम नसल्याने ज्याला वाटेल त्याने याचे वाटप केले. परिणामकारक निष्कर्ष मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने वाटप व निर्माणावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट
करोनाबाधित रुग्णांवर होमिओपॅथीचे उपचार अत्यंत प्रभावी ठरू शकतात. इतर आजारग्रस्त बाधितांसाठी तर ते उपयुक्त आहेत. मात्र, दुर्दैवाने अद्याापही त्याचा वापर झालेला नाही. रोगप्रतिकारशक्तीसाठी होमिओपॅथी औषधाचा चांगला उपयोग होत आहे.
– डॉ.संदीप चव्हाण, समन्वयक व होमिओपॅथी तज्ज्ञ, अकोला.