News Flash

सर्वसामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, तर १५ मंत्र्यांना दिली नाहीत वीजबिलं

करोना महामारीमळे देशात लॉकडाउन घेण्यात आला. या काळात अनेकांना आर्थिक संकाटांचा सामनाही करावा लागला. यातच भर म्हणून महावितरणाने सर्वसामान्यांना अवाच्या सवा वीज बिलं दिली. लॉकडाऊनमध्ये

करोना महामारीमळे देशात लॉकडाउन घेण्यात आला. या काळात अनेकांना आर्थिक संकाटांचा सामनाही करावा लागला. यातच भर म्हणून महावितरणाने सर्वसामान्यांना अवाच्या सवा वीज बिलं दिली. लॉकडाऊनमध्ये जिथं सर्वसामान्यांची वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथेच राज्यातील बड्या १५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलं आली नसल्याची माहिती समोर आली आहे. धनजंय मुंडे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि इतर मंत्र्यांना मागील काही महिन्यापासून वीज बिल आलं नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलेय.

लॉकडाउनच्या काळात आलेली वीजबिलं भरताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झाला होता. सर्वसामन्यांसह सेलिब्रिटींनाही वीजबिलाचा शॉक बसला होता. या प्रकरणात RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये या महिन्यात राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये राज्यातील १५ मंत्र्यांना वीजबिलं पाठवण्यात आलेली नाहीत. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मेपासून पाच मंत्र्यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेली नाहीत. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. मागील महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड़, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेले नाहीत.


आरटीआयमधून आलेल्या बातमीनंतर याचा सर्वसामान्य नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. बड्या मंत्र्यांना विजेचं बिल का पाठविण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:47 pm

Web Title: no information on electricity bills of ministers bungalow public works department nck 90
Next Stories
1 अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस… -राज ठाकरे
2 मी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासा
3 शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहायची भूक लागली आहे, निरुपम यांचा राऊतांना टोला
Just Now!
X