News Flash

मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही: निवडणूक आयोग

इंटरनेट आणि वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रातिनिधीक छायाचित्र

मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. यापूर्वी स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. आता त्यावर हे जॅमर बसवणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ आहेत. तसंच या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केलं. आम्ही व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसंच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.

ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत जॅमर बसवण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:21 am

Web Title: no mobile jammers out side counting stations and strong room evm cant hack election commission jud 87
Next Stories
1 विजयाची घाई : निकालाआधीच तीन उमेदवारांनी फोडले फटाके
2 द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
3 मतदानावेळी  १३८ यंत्रे बंद पडली
Just Now!
X