News Flash

येडियुरप्पांचा अडीच दिवसांचा विक्रम अबाधित राहणार, अजित पवारांचा टोला

केंद्र सरकार देशात जीवनावश्यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले असून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे.

संग्रहित छायाचित्र

अडीच दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा येडियुरप्पांचा विक्रम देशातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री किंवा पक्ष मोडू शकणार नाही, असा उपहासात्मक टोला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक पार पडली. पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी काही कोटींची ऑफर दिल्याच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या. यातून भाजपाची मानसिकता दिसून येते. अमित शाहंना याप्रकरणी सारवासारव देखील करावे लागल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकार देशात जीवनावश्यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले असून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे लक्षात घेता पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या वेळी पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:18 pm

Web Title: no one break b s yeddyurappas record to became two and half days chief minister says ncp leader ajit pawar
Next Stories
1 मुलांना सांभाळणं आजी-आजोबांची जबाबदारी नाही – न्यायालय
2 पाण्याच्या लेखापरीक्षणास टाळाटाळ
3 इन्स्टाग्रामवर बदनामीकारक मजकूर टाकून पैसे उकळणारा अटकेत
Just Now!
X