सामान्य प्रशासन विभागाने एक महत्वाचा निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार आता शासनाच्या विविध विभागाच्या गट -क, गट – ड च्या पदभरती संदर्भात परीक्षा एमपीएससीमार्फत होणार नाहीत.

या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वार सांगण्यात आले आहे की, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यक्षेत्रातील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट -ब (अराजपत्रित) व गट -क संवर्गातील पदभरती संदर्भात महापरीपक्षा पोर्टलचा वापर करण्याबाबतचे या विभागाचे संदर्भाधीन दिनांक १४ मार्च २०१८ चे परिपत्रक देखील याद्वारे अधिक्रमित करण्यात येत असून, परीक्षा प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सुधीरीत सूचना देण्यात येत आहेत.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यक्षेत्रातील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट -ब (अराजपत्रित) व गट -क संवर्गातील पदभरतीच्या प्रक्रियेसंदर्भांत असे आदेश देण्यात येत आहेत की, संबधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिकस्तरीय निवडसमित्या तसेच राज्यस्तरीय निवडसमित्यांनी पदभरती प्रक्रियेबाबतच्या स्पर्धा परीक्षांसाठी यापुढे सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या दिनांक २० फेब्रुवरी २०२० च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार महाआयटीमार्फत समाविष्ट केलेल्या व्हेंडर च्या यादीतून एका ‘ओमएमआर’ व्हेंडरची निवड करून परीक्षा प्रक्रिया पार पाडाव्यात. याकरिता संबंधित निवड समित्यांना समन्वय समिती तसेच निवड समितीच्या अध्यक्षांना समन्वय अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. निवड समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार हे अधिकार निवड समितीतील कोणत्याही अधिकाऱ्यास प्रदान करता येतील. पदांची जाहिरात, निवडप्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे या परीक्षा प्रक्रियेच्या संचालनाची जबाबदरी संबंधित निवड समितीची राहील. समाविष्ट केलेल्यांमधून निवड करून घेतलेल्या ‘ओमएमआर’ व्हेंडरकडून संबंधित निवड समित्यांनी पदभरतीसाठीची प्रक्रिया राबवून परीक्षा आयोजित कराव्यात, असे सांगण्यात आले आहे.