जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्या‍पीठाच्या नामकरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिले जाणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामांतर करून या विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यापीठाच्या नामकरणाची घोषणा केली होती.

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामविस्ताराचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली. या अध्यादेशानुसार हे विद्यापीठ ११ ऑगस्ट म्हणजेच बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या नावाने ओळखले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम- २०१६ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विधानमंडळासमोर सादर करावयाच्या अध्यादेशाच्या मसुद्यासही मान्यता देण्यात आली.

मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार
राज्यातील विविध महाविद्यालये- शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७ – १८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेला ऑफलाईन पद्धतीने वितरित केली जाणार आहे.