News Flash

भाजपवर नाही, तर फडणवीस यांच्या निकटवर्तीयांवर नाराज – खडसे

मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले.

 

भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. खडसे म्हणाले, की मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून माझ्यावर अन्याय होत आहे. पक्षाकडून नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

खिचडी सरकार टिकणार नाही

विधानसभेत जनतेने भाजप-सेना युतीला कौल दिला होता. परंतु, सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षांकडून चुका झाल्या. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. सध्याचे सरकार हे तीन विचारांची खिचडी असून ते फार काळ टिकणार नाही, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:35 am

Web Title: not angry at bjp but at fadnavis close proximity abn 97
Next Stories
1 एकनाथ शिंदे रमले गावात आणि शेतातही!
2 महाराष्ट्रात सीएए लागू करण्याचा प्रश्नच नाही, दोन मंत्र्यांचा विरोधी सूर
3 तारापूरच्या तारा नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट, मालकासह पाचजण ठार
Just Now!
X