News Flash

राज्यमंत्री तनपुरेंसह मनपा आयुक्तांना नोटीस

याचिकाकर्ते शेख यांच्यावतीने अ‍ॅड. आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली व त्यांना अ‍ॅड. अर्जुन लूक यांनी सहाय्य केले.

मनपा अभियंता कल्याण बल्लाळ पदावनत प्रकरण

नगर : महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता कल्याण बल्लाळ यांना ओव्हरसीअर पदावर पदावनत करण्यास दिलेल्या स्थगिती प्रकरणात नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगर विकासचे प्रधान सचिव, मनपा आयुक्त शंकर गोरे व बल्लाळ अशा चौघांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत. यावर १६ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते, सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दिली. या याचिकेची सुनावणी १६ जूनला झाली. याचिकाकर्ते शेख यांच्यावतीने अ‍ॅड. आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली व त्यांना अ‍ॅड. अर्जुन लूक यांनी सहाय्य केले. तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. व्ही. एन. पाटील—जाधव यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनपा आयुक्त व बल्लाळ यांच्यासह नगरविकास मंत्री तनपुरे व राज्याच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्यावतीने देखील अ‍ॅड. पाटील—जाधव यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी १६ जुलैला ठेवण्यात आली आहे.

या याचिकेबाबत माहिती देताना शेख यांनी सांगितले की, बल्लाळ हे १९९५ मध्ये तत्कालिन नगरपालिकेत ‘सबओव्हरसीयर’ या पदावर रुजू झाले. सन २००० मध्ये कनिष्ठ अभियंता हे भटक्या जमातीसाठी सरळ सेवेने भरती करण्यासाठी राखीव असताना त्या पदावर बल्लाळ यांना नियमबापणे पदोन्नती देण्यात आली. वास्तविक बल्लाळ अनुसूचित जमाती प्रवर्गाचे असतानाही त्यांनाही पदोन्नती बेकायदेशीरपणे देण्यात आली. या विरोधात शेख यांनी नगरविकास विभागाकडे सन २०११ पासून पाठपुरावा करीत नियमबापणे पदोन्नती झाल्याचे निदर्शनास आणून दिले. शासनाने याची दखल घेत या पदोन्नतीबाबत मनपा आयुक्तांनी एक महिन्यात निर्णय घेण्याचे तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर  जबाबदारी निश्चित करुन कारवाईचे आदेश २८ फेब्रुवारी २०२० रोजी दिले.

त्याप्रमाणे तत्कालिन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कार्यवाही केली नसल्याने त्याबाबत शेख यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली. त्यावरून शासनाने १० नोव्हेंबर २०२० रोजी मनपा आयुक्त यांना बल्लाळ यांची शाखा अभियंता या पदाच्या पदोन्नती साखळीतील ‘सबओव्हरसीयर’ या पदाच्या समकक्ष पदावर पदावनत करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. पण, त्याप्रमाणे आयुक्त यांनी कार्यवाही केली नाही. मात्र, ही पदावनती  रद्द करण्याबाबत बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्याकडून पदावनतच्या कार्यवाहीस स्थगिती मिळविली. त्यामुळे बल्लाळ यांनी मिळविलेल्या स्थगिती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:33 am

Web Title: notice municipal commissioner minister of state tanpure ssh 93
Next Stories
1 परराज्यातील सरकारी गहू, तांदळाचा ८ लाखांचा अवैध साठा जप्त
2 पीकविम्याच्या बीड प्रारुपास शेतकऱ्यांचाच विरोध
3 विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळला
Just Now!
X