02 December 2020

News Flash

चौकशी अहवाल विलंब, जळगाव पालिका अधिकाऱ्यांना नोटीस

आयुक्तांच्या दणक्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात विद्युतपंप, हातपंप घोटाळा संदर्भात चौकशी अहवाल न पाठविल्याने आयुक्त जीवन सोनवणे यांनी तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक एस. बी. भोर, पाणीपुरवठा विभागाचे विजय यादव आणि कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले यांना नोटीस पाठवून सात दिवसांत अहवाल न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या दणक्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या विद्युतपंप व हातपंप प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली होती, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे प्रकरण पाठविण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली; परंतु समितीने अद्यापपर्यंत चौकशी पूर्ण केलेली नाही. तक्रारदाराने ११ महिन्यांपासून समितीने चौकशी पूर्ण केली नसल्याने कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश आयुक्त सोनवणे यांनी दिले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:04 am

Web Title: notice to jalgaon municipal officials
Next Stories
1 ‘जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रकरणे मंजूर करावीत’
2 कोर्लई किल्ल्याजवळील समुद्रात मालवाहू जहाज अडकले
3 नाशिकमध्ये दुचाकीस्वाराचा पाय झाडाखाली अडकला; तासाभराच्या प्रयत्नानंतर सुटका
Just Now!
X