कसाब याला फाशी दिल्याचा आनंद आहे, त्याचबरोबर भारतात कायद्याचे राज्य असल्याचा जगाला संदेश दिला गेला. आता प्रतीक्षा आहे ती सूत्रधारांवर कारवाई होण्याची!
..मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामठे यांच्या पत्नी विनिता यांनी त्यांच्या भगिनी खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्फत ही प्रतिकिया दिली. ‘२६/११ च्या हल्ल्याचा चार वर्षे होत आली. त्यात अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. त्यामुळे कसाब याला फाशी दिली गेल्याचे समाधान आहे. आज योग्य न्याय झाला. इतकेच नव्हे तर या देशाचा न्यायप्रक्रियेवर विश्वास आहे व कायद्याचे राज्य आहे हा संदेश जगाला दिला गेला. आपला देश दहशतवादाबाबत कठोर असल्याचेही त्यातून जगाला दाखवून दिले. आता या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाई व्हावी. कारण जगाला दहशतवादाने ग्रासलेले असताना कारवाई होणे आवश्यक आहे,’ असे त्या म्हणाल्या.