News Flash

एल्गार परिषदेचा तपास केंद्राने एनआयएकडे सोपवला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी केली होती.

एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत असताना, केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे.

हे प्रकरण एनआयकडे वर्ग होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार घाबरल्यामुळे एनआयकडे हा तपास सोपवण्यात आला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

एनआयए ही भाजपाची नाही तर स्वतंत्र संस्था आहे. वास्तव बाहेर आले पाहिजे, प्रकाश आंबेडकर कशाला घाबरतात असे विनोद तावडे म्हणाले. राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. हा थेट राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 9:35 pm

Web Title: now nia will investigate elgar parishad dmp 82
Next Stories
1 देशविरोधी कटाचे राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत – गृहराज्य मंत्री
2 बीड जिल्हा परिषदेवर धनंजय मुंडे यांचा पुन्हा वरचष्मा
3 अजून किती नीच पातळी गाठणार; धनंजय मुंडेंचा भाजपावर हल्लाबोल
Just Now!
X