खेळांमधील परस्थिती आता बदलली आहे. मुलींनीही खेळांमधील आपले सुप्त गुण जोपासत पुढे यायला हवे, माझ्यासाठी आता पुढील सुवर्णपदक हे २०२०च्या ऑलम्पिकचेच असेल, असा विश्वास सुवर्णपदक विजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केल्यानंतर घरी परतताना पुण्यातील विमानतळावर त्यांचे आगमन झाले यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Shooter Tejaswini Sawant arrives at Pune airport after winning gold medal in 50m rifle event at #CommonwealthGames2018 pic.twitter.com/dtodARgIBu
— ANI (@ANI) April 15, 2018
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांचे पुणे विमानतळावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र क्रीडा विभागामार्फत पुणेरी पगडी घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तेजस्विनी यांचे पती, कुटुंबीयदेखील उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना तेजस्विनी सांवत म्हणल्या, राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी खूप सराव केला होता. त्याचा फायदा या स्पर्धेत झाला असून सुवर्ण पदक जिंकण्यात सर्वांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी माझे कुटुंबिय कायम माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच मी ही सुवर्ण पदकाची कामगिरी करु शकले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 1:52 pm