News Flash

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले

पंधरा दिवसांत रूग्ण दुप्पट

(संग्रहित छायाचित्र)

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रूग्ण वाढत्या संख्येने आढळून येत असले तरी दुसरीकडे, रूग्ण बरे होऊन घरी जाण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात एकूण २३९ रूग्ण करोनामुक्त झाले, तर गुरुवारी संपलेल्या दुसऱ्या पंधरवडय़ात हाच आकडा दुपटीपेक्षा किंचित  व जास्त, ५३० झाला आहे. तसेच, गेल्या चार महिन्यांत करोनामुक्त रूग्णांची एकूण संख्या ११९३ (६९ टक्के) आहे.

पंधरा दिवसांत रूग्ण दुप्पट

याचबरोबर, जिल्ह्यात करोनाबाधित रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मात्र फक्त १५ दिवसांवर आले आहे. गेल्या २१ जुलैपर्यंत ते २० दिवस होते. या महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ाअखेर जिल्ह्यात ३८८ सक्रीय करोनाबाधित रूग्ण होते. पण पुढील फक्त दोन आठवडय़ात त्यामध्ये आणखी ७८२ नवीन करोनाबाधित रूग्णांची भर पडली. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गरबा केमिकल्स कंपनीच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळपणा यासाठी विशेष कारणीभूत आहे.

या संदर्भात नोंद घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे, या महामारीचा प्रादूर्भाव जिल्ह्यातील मुख्यत्वे रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीनच तालुक्यांपुरता मर्यादित आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत प्राप्त अहवालांमध्ये २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी १४ रूग्णांच्या त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय  रुग्णांची गेल्या चार महिन्यांतील एकूण संख्या १७७४ झाली आहे.

रत्नागिरीत सापडलेल्या रुग्णांपैकी तीन पोलीस कर्मचारी असून शहर पोलीस ठाण्यातील दोन, तर ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याशिवाय एका माजी जेष्ठ नगरसेवकाला देखील करोनाची लागण झाली आहे. इतर रूग्ण शहर व तालुक्यातील मिळून,  भाटय़े नवानगर, आठवडा बाजार, गोळप, पूर्णगड, मारुती मंदिर, खेडशी, कार्ला, रवींद्र नगर, कापडगाव, सैतवडे आणि जेके फाईल येथील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:02 am

Web Title: number of corona free patients has increased in ratnagiri district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रायगडमध्ये करोनामुळे २० जणांचा मृत्यू
2 कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे-मुख्यमंत्री
3 चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ५२३, ३२२ रुग्ण बरे
Just Now!
X