05 July 2020

News Flash

रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या तीनशेवर

जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३०७ झाली आहे

संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत एकूण ३८ नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३०७ झाली आहे आणि एकूण १० जणांचा मृत्यू ओढवला आहे.

मंगळवारी सायंकाळी १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये  कामथे ग्रामीण रूग्णालयातील ४ रूग्ण आहेत, तर दापोली आणि संगमेश्वर रूग्णालयात प्रत्येकी २ आणि रत्नागिरी व राजापूरच्या रूग्णालयात प्रत्येकी १ रुग्ण आहेत.

यापूर्वी सोमवारी रात्री उशीरा १० करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ९ जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. तर ३० मेला मृत झालेल्या एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे करोनाबधितांची एकूण संख्या ३०७ झाली आहे. याचबरोबर आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी  दिवसभरात ४२ रुग्णांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. त्यापैकी सकाळच्या सत्रात १८, तर रात्री उशिरा १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्वजण मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोनागरस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात १ लाख  ८ हजार ७८७ चाकरमानी दाखल झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:10 am

Web Title: number of corona patients in ratnagiri district is over three hundred abn 97
Next Stories
1 टाळेबंदीच्या संकटावर प्रयत्नांनी मात
2 ‘निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात माणुसकी सोडू नका’ ‘राज’पुत्राचं महाराष्ट्राला पत्र
3 बुलडाणा जिल्ह्यातील नऊ जणांची करोनावर मात
Just Now!
X