आदिवासीबहुल जिल्ह्यातील खेडय़ापाडय़ात आता करोना विषाणुंचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोना बाधितांची संख्या ३० पर्यंत गेली आहे.  मोठय़ा शहरातून येणारे रहिवासी ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढवितांना दिसून येत आहेत.

जिल्ह्य़ातील ३३ टक्के करोनाबाधित हे ग्रामीण भागातील म्हणजे गाव पाडय़ातील आहेत. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला होता. सध्या रूग्णसंख्या ३० असून त्यातील २१ रूग्ण जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा आणि अक्कलकुवा शहरातील आहेत. ग्रामीण भागातल्या नऊपैकी अक्कलकुवा तालुक्यातील एक, तर नंदुरबार तालुक्यातील आठ करोनाबाधितांचा समावेश होता. पहिला रुग्ण सापडल्यानंतर महिन्याभरानंतर जिल्ह्यातील २१ रूग्णांपैकी दोन जनांचा मृत्यू झाला. तर १९ जण उपचार घेऊन घरी परतल्याने जिल्ह्यातील रूग्णांचा आकडा शुन्य झाला होता. परंतु, १९ मे रोजी मुंबई येथील आपल्या मुलीकडे राहुन घरी परतलेला रजाळेचा एक जण बाधित झाला. दुसऱ्या टप्प्यात मुंबईसारख्या शहरातून नंदुरबारकडे करोना विषाणुचा फैलाव झाला. रजाळे गावातील करोणा बाधिताच्या संपर्कात आलेले पाच जणदेखील सकारात्मक आढळून आल्याने जिल्ह्यात सध्या नऊा बाधितांवर उपचार सुरु आहेत.  यातही आता राज्यासह परराज्यातुन हजारो मजूर जिल्ह्यात परतले असून त्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.