News Flash

जालन्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतीच; रुग्णांचा आकडा १२८० वर

जिल्ह्य़ात नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण कमी

जालन्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतीच; रुग्णांचा आकडा १२८० वर
प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाबाधितांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे जालना शहरात चिंतेचे वातावरण आहे. दहा दिवसांची टाळेबंदी आणखी पाच दिवस वाढविली, तरी शहरात दररोज वेगवेगळ्या भागातून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्य़ातील एकूण १ हजार २८० करोनाबाधितांपैकी जवळपास ७८ टक्के जालना शहरातील आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे जिल्ह्य़ात मृत्युमुखी पडलेल्या ५२ रुग्णांपैकी ४२ जण म्हणजे जवळपास ८१ टक्के रुग्ण जालना शहरातील आहेत.

जिल्ह्य़ात नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण कमी आहेत. जालना शहरासह जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यांच्या ठिकाणी करोनाचे एकूण १ हजार ७३ रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात २०७ रुग्ण आढळले आहेत. जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणी आतापर्यंत ३० तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ३९ रुग्ण आहेत. अंबड तालुक्याच्या ठिकाणी २१ तर ग्रामीण भागात ३८ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत ७५३ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यापैकी ५१८ जालना शहरातील आहेत.

एप्रिल महिन्यात जिल्ह्य़ातील एकूण तीन करोनाबाधित होते. तर मे मध्ये एकूण १२३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यात ४२८ रुग्ण आढळले तर जुलै महिन्यात आतापर्यंत ७२६ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक ७२७ रुग्ण १६ ते ४५ वयोगटातील आहेत.

आतापर्यंत जिल्ह्य़ात आरोग्य सेवेतील ४० व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये तीन शासकीय तर नऊ खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. करोनाबाधित आढळून आलेल्या परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची संख्या २८ आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण २०६ क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली होती. त्यापैकी २३ क्षेत्रे सध्या प्रतिबंधित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:13 am

Web Title: number of corona victims in jalna is 1280 abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 साताऱ्यात ७० रुग्ण वाढले; करोनाबाधित ६ जण दगावले 
2 गडचिरोलीसह राज्यातील शाळा ३ ऑगस्टपासून सुरू होणार – वडेट्टीवार
3 ‘राजस्थानबाबत महाराष्ट्र भाजपावर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज’
Just Now!
X