रायगड जिल्ह्यात करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत ३० करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा ६५३ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात ३० नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १४, पनवेल ग्रामिणमधील ६, उरणमधील २, अलिबाग ३, मुरुड १, श्रीवर्धन ३, म्हसळा १ मधील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल येथे १, श्रीवर्धन २ तर म्हसळा येथील एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २४६५ जणांची करोनाचाचणी करण्यात आली. यातील १७४२ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ६५३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ७० जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ३१७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ३०६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १३५, पनवेल ग्रामिण हद्दीतील ६७, उरणमधील ८१, पेण ३, अलिबाग ४, श्रीवर्धन येथील २, मुरुड १, कर्जत १, खालापूर १, माणगाव १०, महाड २ आणि म्हसळा येथील एका करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ९६ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले २५ हजार ४४८ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.