रायगड जिल्ह्यात करोनाची व्याप्ती वाढली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत ५० नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोनाबाधितांचा आकडा ७५७ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात ५० नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील २०, पनवेल ग्रामिणमधील ९, उरणमधील १०, अलिबाग २, कर्जत ३, माणगाव ५,  पोलादपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ३५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २६६४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १८११ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ७५७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ९६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ४०८ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ३१६ करोनाबाधित रूग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १४७, पनवेल ग्रामीण हद्दीतील ५९, उरणमधील ५१, पेण ४, अलिबाग ६, श्रीवर्धन येथील १, मुरुड ३, कर्जत ४, खालापूर  ४, तळा १, रोहा ५, माणगाव २९, महाड १, पोलादपूरमधील ४ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ९६ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले २५ हजार ५५२ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यात सुरूवातीला उत्तर रायगडमधील पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांत करोनाचा प्रसार मर्यादित होता. मात्र गेल्या २३ दिवसांत जिल्ह्यात मुंबईतून ७० हजारहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची व्याप्ती वाढली आहे. दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, पोलादपूर, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा श्रीवर्धन तालुक्यातही करोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली आहे. यातील जवळपास सर्वच जण मुंबईतून आलेले आहेत.