सोलापुरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वरचेवर वाढत चालल्यामुळे हा सोलापूरकरांसाठी सार्वत्रिक चिंतेचा विषय ठरला असता काल शुR वारी एका रात्रीत करोनाबाधित २१ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकू ण रुग्णसंख्या ३६४ वर पोहोचली असून यात २४ मृतांचा समावेश आहे. दरम्यान, आज ३७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. करोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा १५० झाला.

सोलापुरात करोनाचा पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णासंख्या वाढत चालली असून सध्या सरासरी दहाप्रमाणे रुग्ण आढळून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णाालयासह राज्य विमा कामगार रुग्णालय व डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाांवर उपचार होत आहेत.

आतापर्यंत करोना संशयित अशा ४१२० रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात ३६४ रुग्ण करोनाबाधित असल्याचे दिसून आले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णाालयात करोना चाचणी केंद्रात दररोज ९० चाचण्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक चाचण्या घेतल्या जातात. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे त्या प्रमाणात रुग्णसंख्याही वाढत आहे. यातूनच रुग्णांची साखळी तुटण्याबद्दल विश्वास व्यक्त केला जात आहे.