26 February 2021

News Flash

मराठा बांधवांना SEBC प्रवर्गातून आरक्षण नको, ओबीसी फेडरेशनची भूमिका

मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचीही ओबीसी फेडरेशनची तयारी

(संग्रहित छायाचित्र)

मराठा बांधवाना SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका ओबीसी फेडरेशनने घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण लागू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ओबीसी फेडरेशनची बैठक मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात पार पडली. या बैठकीला प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक श्रावण देवरे, धोबी समाजाचे नेते बालाजी शिंदे, आमदार हरिभाऊ राठोड आणि विद्रोही कवी सचिन माळी यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे काय होणार? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल देणारा मागासवर्ग आयोग घटनाबाह्य पद्धतीने नेमला गेल्याचा आरोपही या नेत्यांनी केला आहे. तसेच सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न आहेत असाही आरोप ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी केला आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंबंधीचे सगळे आक्षेप नोंदवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा या विरोधामुळे आणखी तापण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं. मात्र ओबीसी समाजाच्या विविध नेत्यांनी मराठा बांधवांना SEBC या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचीही तयारी ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी दर्शवली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 6:04 pm

Web Title: obc federation opposes maratha reservation may appeal in court
Next Stories
1 गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
2 ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
3 ओढणीने हात बांधून प्रेमी युगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या
Just Now!
X