News Flash

अधिकारी आले, प्रदूषण घटले!

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तारापूरमधील प्रदूषणकारी कारखान्यांवर दुर्लक्ष केल्याने तारापूर देशात सर्वाधिक प्रदूषणकारी भाग झाला.

संग्रहित छायाचित्र

तारापूरमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी; दोन दिवस उद्योजकांकडून नियमांचे पालन

प्रदूषणाने काळवंडलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात नागरिकांना दोन दिवस मोकळा श्वास घेता आला. कोणत्याही कारखान्यांने दोन दिवस हवेत विषारी वायूही सोडला नाही, तर कोणी रासायनिक सांडपाणीही सोडले नाही. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य सचिव तारापूरमध्ये ठाण मारून बसले होते. दोन दिवस ते पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे कळाल्याने उद्योजकांनी नियमांचे पालन करून प्रदूषणावर नियंत्रण मिळवले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तारापूरमधील प्रदूषणकारी कारखान्यांवर दुर्लक्ष केल्याने तारापूर देशात सर्वाधिक प्रदूषणकारी भाग झाला. प्रदूषणकारी कारखान्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य सचिव ई. रविंद्रन यांनी तारापूरमध्ये प्रदूषणकारी कारखान्यांची शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर दोन दिवस कुठेही वायुप्रदूषण दिसून आले नाही. कारखान्यांमधून विषारी वायू सोडण्यात आला नाही. मात्र रविवारपासून पुन्हा प्रदूषण सुरू झाल्याचे दिसून आले.

अधिकाऱ्यांवर कारवाई नाही

तारापूर औद्योगिक  क्षेत्रातील प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यावर तारापूरमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते यांनी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची  कारवाई करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:22 am

Web Title: officers pollution industrial akp 94
Next Stories
1 कांद्याच्या साठवणुकीतून महागाईवर मात
2 मासेमारी बोटीला जहाजाची धडक
3 बँका बंद होत असल्याच्या अफवेने संभ्रम
Just Now!
X