28 September 2020

News Flash

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सुशांतचा सन्मान

सुशांतला मिळणार मरणोत्तर सन्मान

(संग्रहित छायाचित्र)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात (Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2021) सुशांतला सन्मानित केलं जाणार आहे.  दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२१ ‘मध्ये सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र, हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी रंगणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.


गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीतर्फे सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्विकारला होता. याविषयी तिने सोशल मीडियावर माहितीदेखील दिली होती.

सुशांतच्या चित्रपटांसाठी खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन?

‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सुशांतच्या चित्रपटांसाठी खास एका वेगळ्या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरदेखील त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य जण आहे. तसंच त्याला आता जो मान, सन्मान मिळतोय तो यापूर्वी मिळायला हवा होता. परंतु, तो मिळाला नाही. त्यामुळेच आता त्याच्यासाठी सरकारद्वारे खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 10:14 am

Web Title: official instagram page announced sushant singh rajput to be honored at dada saheb phalke international film festival awards 2021 ssj 93
Next Stories
1 उध्दवा अजब तुझे सरकार! – राजू शेट्टी
2 मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट, मराठी विरुद्ध कन्नड वाद टाळा; एकनाथ शिंदेंच येडीयुरप्पांना पत्र
3 “बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा…”; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला
Just Now!
X