News Flash

रायगड- उरणजवळ तेलाने भरलेले टँकर उलटले, रस्त्यावर तेल पसरल्याने वाहतूक कोंडी

रायगडमधील उरणजवळ तेलाचे दोन टँकर उलटले आहेत

रायगडमधील उरणजवळ तेलाचे दोन टँकर उलटले आहेत. जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर हे टँकर उलटले असून रस्त्यावर तेल पसरलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालं. रस्त्यावर तेल असल्याने वाहतूक कोंडी झाली असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर तेल पसरलं असल्याने अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान तेल हटवण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:10 pm

Web Title: oil tanker overturn in uran of raigad sgy 87
Next Stories
1 “…तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”; मंत्रिमंडळातून डावललेल्या रामदास कदमांवर घणाघाती टीका
2 पंढरपूर : आजपासून विठ्ठल मंदिरात मोबाईलला नो एन्ट्री
3 काय आहे भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास?
Just Now!
X