News Flash

साताऱ्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर उलटला तेलाचा टँकर

तेलाची वाहतूक करणारा हा अपघातग्रस्त टँकर रस्ता सोडून विरुद्ध दिशेला जाऊन मोटारीवर आदळून उलटला

पुणे-बंगळुरु महामार्गावर तेलाचा टँकर उलटला आहे. साताऱ्यातील शेंद्रे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. तेलाची वाहतूक करणारा हा अपघातग्रस्त टँकर रस्ता सोडून विरुद्ध दिशेला जाऊन मोटारीवर आदळून उलटला. यामुळे महामार्गावर तेल गळती झाली होती. या अपघातात मोटारीचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बुधवारी पहाटेच्या सुमारास पुणे बंगळुरु महामार्गावर शेंद्रे गावाच्या हद्दीत कोल्हापूरकडे जाणारा तेलाचा टँकर आपली मार्गिका सोडून विरूद्ध बाजूला मोटारीवर जाऊन आदळला आणि उलटला. यामुळे रस्त्यावर तेल सांडले होते. अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:42 pm

Web Title: oil tanker overturn on pune bangalore highway in satara sgy 87
Next Stories
1 संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज? ‘त्या’ फेसबुक पोस्टमुळे रंगली चर्चा
2 चव्हाण की, चतुर्वेदी?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावे स्पर्धेत
3 रावसाहेब दानवेंचा फोटो पाहून खैरेंचा चढला पारा; पदाधिकाऱ्यांना झापले
Just Now!
X