06 July 2020

News Flash

एम. ए.च्या परीक्षार्थीना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका!

एम. ए.च्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्राच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर देण्यात आल्याने विद्यार्थी चाटच पडले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा

| April 11, 2015 01:30 am

एम. ए.च्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्राच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर देण्यात आल्याने विद्यार्थी चाटच पडले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार चव्हाटय़ावर आला.
शुक्रवारी एम. ए.च्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा द्वितीय सत्राचा पेपर होता. या वेळी विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर न पाठवता जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या. सर्वच केंद्रांत हा प्रकार घडला. जालन्यातल्या मत्स्योदरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यापीठाशी संपर्क साधून नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवण्याची मागणी केली. यानंतर तब्बल दीड तासाने विद्यापीठाने नवीन ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठवली. दरम्यान, या धामधुमीत बराच उशीर झाल्याने प्रश्नपत्रिका सोडवण्यास परीक्षार्थीना वेळ वाढवून देण्यात आली. या प्रकाराचा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात या घटनेचा निषेध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2015 1:30 am

Web Title: old syllabus question paper to ma student in dr babasaheb ambedkar marathwada university
Next Stories
1 एस.टी. बस-मालमोटारीची धडक; २ ठार, ३२ जखमी
2 एक कोटी ७० लाखांचा प्रशिक्षण घोटाळा
3 शहापुरात तीन पोलिसांना मारहाण
Just Now!
X