News Flash

ट्रकने धडक दिल्याने पादचारी वृद्ध ठार

ट्रकने धडक दिल्याने गोकुळ शिरगाव येथील कोंडुसकर पेट्रोल पंपासमोर पादचारी वृद्ध ठार झाला. नामदेव बापू पाटील (वय ६२ , रा. हासुर दुमाला, ता. करवीर) असे

| May 22, 2014 03:25 am

ट्रकने धडक दिल्याने गोकुळ शिरगाव येथील कोंडुसकर पेट्रोल पंपासमोर पादचारी वृद्ध ठार झाला. नामदेव बापू पाटील (वय ६२ , रा. हासुर दुमाला, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद गोकुळशिरगाव पोलिसात झाली आहे. पोलिसांनी ट्रक चालक जुगल किशोर सिंग याला अटक केली आहे.
   ट्रक चालक जुगल किशोर सिंग आज सकाळी ट्रक घेऊन पुण्याच्या दिशेने चलला होता. कोंडुसकर पेट्रोल पंपावर त्याने  ट्रकमध्ये डीझेल टाकले. यानंतर तो येथे असलेल्या पुलाखालून ट्रक रस्त्याच्या पलीकडे नेत होता. यावेळी त्याच्या ट्रकची क्लीनर साईडकडून पाटील यांना धडक बसली. यामुळे ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:25 am

Web Title: older pedestrians killed after truck crash 2
Next Stories
1 गोळी लागून जवानाचा मृत्यू
2 ‘दोन रुपयां’वरून दोन खात्यांत जुंपली!
3 ऊस उत्पादकांनीच गद्दारी केली, मात्र दुष्काळी जनतेने मताधिक्य दिले- खोत
Just Now!
X