हर्षद कशाळकर

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. द्रुतगती मार्गावर असे अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षभरात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रायगड जिल्ह्य़ाच्या हद्दीत  १०३ अपघात नोंदविले गेले. यात ३१ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जण जखमी झाले. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. वाहनचालकांचा बेदरकारपणाही यास कारणीभूत ठरत आहे.

Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

बहुतांश अपघाताना वाहनचालकांचा बेजबाबदारपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले आहे. महामार्गावर वाढलेली अवजड वाहतूकही अपघातांना काही प्रमाणात कारणीभूत ठरते.  गेल्या मंगळवारी मध्यरात्री याचाच प्रत्यय आला. एक कंटेनर मुंबईच्या दिशेने येत होता. घाटातून उतरत असताना खालापूर टोल नाक्याजवळ काही किलोमीटर अंतरावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे तो एका टेम्पोला जाऊन धडकला. या टेम्पोने अन्य दोन गाडय़ांना धडक दिली. मागून येणाऱ्या कंटेनरने पुन्हा या तीनही वाहनांना धडक दिली. त्यामुळे अपघाताची भीषणता अधिकच वाढली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. महामार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

द्रुतगती महामार्गावर रायगड पोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये २२० अपघातांची नोंद झाली. यात ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ७५ जण गंभीर जखमी झाले. २०२० मध्ये या महामार्गावर १०३ अपघातांची नोंद झाली. यात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण गंभीर जखमी झाले. गेल्या वर्षी टाळेबदी आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे यामुळे या महामार्गावरील अपघाते निम्म्याने घटले. पण अपघातातील दगावणाऱ्या आणि जखमींची संख्या फारशी घटली नाही. चिंताजनक बाब म्हणजे यातील बहुतांश अपघात हे लोणावळा ते खालापूर टोल नाक्याच्या दरम्यान होतात. त्यामुळे या अपघात प्रवणक्षेत्रात अपघातांचे प्रमाण कसे कमी होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

प्रमुख कारणे

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत लोणावळा ते खालापूर टोल प्लाझापर्यंत तीव्र उतार आहे. त्यामुळे वाहन चालक बरेचदा पेट्रोल डिझेलची बचत व्हावी म्हणून वाहनाचे इंजिन बंद करून नेतात. पण अशा परिस्थितीत मार्गिका बदलायची वेळ येते तेव्हा गाडीवर ताबा राहत नाही, त्यामुळे अपघात होतात.  रात्रीच्या वेळी द्रुतगती महामार्गावर अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढते, घाटात ही अवजड वाहने मार्गिकेची शिस्त पाळत नाहीत. हे मार्गक्रमण करतांना ते वेग मर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे बरेचदा वेगाने येणाऱ्या बलान गाडय़ा या अवजड वाहनांना येऊन धडकतात.

पहाटेच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असते, गाडी चालवतांना वाहनचालकांना डुलकी लागते, त्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटतो. याशिवाय घाटात बरेचदा अवजड वाहने बंद पडतात. ती रस्त्याच्या कडेला लावून ठेवली जातात. अशावेळी वेगाने येणाऱ्या वाहनांना वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण होते आणि अपघात होतो.

बोरघाटातील तीव्र उतार कमी करणे, आणि धोकादायक वळणे कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनी उतारावर गाडी चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेगमर्यादा पाळणे, मार्गिकेची शिस्त पाळणे आवश्यक आहे. तरच या महामार्गावरील अपघात रोखता येऊ शकतील.

-गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते

घाटात तीव्र उतार आणि तीव्र वळणे आहेत. त्यामुळे वाहने चालविताना ५० ताशी किलोमीटर वेगमर्यादा राखणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. आम्ही दररोज किमान ३०० जणांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पट्टय़ात कारवाई करतो. पण वाहनचालक स्वयंशिस्त पाळत नाहीत आणि अपघात होतात.

– जगदीश परदेशी, पोलीस निरीक्षक, बोरघाट महामार्ग पोलीस