05 June 2020

News Flash

चितळे उद्योग समूहाकडून दीड कोटीची मदत जाहीर

करोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात

चितळे उद्योग समूहाकडून दीड कोटीच्या मदतीचे धनादेश बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

कुठल्याही आपत्तीत मदतीसाठी पुढे येणाऱ्या चितळे उद्योग समूहाने करोना संसर्गाच्या अभूतपूर्व संकटातही समाजासाठी मदतीचा हात दिला आहे. या उद्योग समूहातील ‘बी. जी. चितळे’ यांच्याकडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एक कोटी तर पुण्यातील ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याकडून पंतप्रधान मदतनिधीसाठी पन्नास लाख रुपये दिले.

हे दोन्ही मदतीचे धनादेश आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीश चितळे, निखिल चितळे हे उपस्थित होते.

सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हा निधी दिल्याचे श्रीपाद चितळे यांनी सांगितले. चितळे उद्योग समूह अत्यावश्यक सेवेशी निगडित असल्याने सामाजिक बांधीलकीतून आम्ही तो त्याच कार्यक्षमतेने सुरू ठेवला आहे. हे करताना आम्ही करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती सर्व काळजी घेत आहोत. या दूध पुरवठय़ाच्या सेवेसाठी प्रशासनाकडूनही आम्हाला संपूर्ण सहकार्य होत असल्याचे चितळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 12:34 am

Web Title: one and a half crore support from the chitale industry group has been announced abn 97
Next Stories
1 द्राक्षे बागेतच, तर बेदाणा तयार करण्यात अडचणी
2 पांढऱ्या कांद्याची आवक वाढली, ग्राहकांची प्रतीक्षा
3 रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोम
Just Now!
X