News Flash

वाशिममध्ये एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

रात्री ११ च्या सुमारास घेतला अखेरचा श्वास

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मंगळवार, २६ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. मुंबई येथून आलेल्या करोनाबाधित महिलेसोबत प्रवास केलेल्या पाच व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले होते. त्यांच्यावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून यापैकी ६५ वर्षीय व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून कृत्रीम ऑक्सिजन देऊन डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली,  रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:15 pm

Web Title: one death in washim due to corona virus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्ध्यात करोना योद्ध्यांचा भाजपातर्फे सत्कार
2 पीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा; राष्ट्रवादीचं आवाहन
3 Coronavirus: चोवीस तासात ७५ पोलिसांना करोनाची लागण; एकूण संख्या १९६४ वर
Just Now!
X