14 December 2019

News Flash

महाड-रायगड रस्त्यावर कारला अपघात; एक ठार

नियंत्रण सुटल्यानं अपघात

अपघातग्रस्त कार

महाड-रायगड रस्त्यावर एका भरधाव कारला भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यु झाला, तर एका पोलीस निरीक्षकासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार नाल्यात जाऊन कोसळली.

महाड-रायगड रस्त्यावर मंगळवारी रात्री कारला भीषण अपघात झाला. गोंडाळे फाट्याजवळ भरधाव असलेली कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातामध्ये महाडमधील उद्योजक नितीन मेहता यांचा जागी मृत्यु झाला, तर महाड शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक शैलेश सणस आणि बांधकाम व्यवसाईक योगेश कळमकर हे जखमी झाले आहेत. जखमींवर महाडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे.

First Published on November 13, 2019 8:37 am

Web Title: one killed in car accident on mahad highway bmh 90
Just Now!
X