25 September 2020

News Flash

धुळ्यात ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; अपघातात एकाचा मृत्यू

अपघातात एकजण गंभीर जखमी

जळगाव जिल्हा परिषदेतील पोषण आहारातील मुदतबाह्य साठा प्रकरणातील कारवाईकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

धुळ्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. चाळीसगाव रोडवरील जुनवणे गावाजवळ ही घटना घडली. धुळ्यातील बोरविहिर येथे राहणारे राहुल बंडू गायकवाड (वय १४ वर्षे) आणि बाबू किशोर गायकवाड (वय १८ वर्षे) हे दोघे दुचाकीवरुन चाळीसगाव रोडमार्गे येत होते. जुनवणे गावाजवळील हॉटेल कन्हैय्या समोर त्यांच्या मोटरसायकलला समोरुन येणार्‍या ट्रॅक्टरने धडक दिली.

ट्रॅक्टरच्या जोरदार धडकेमुळे बाबू आणि राहुल गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी दोघांनाही हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर बाबू गायकवाडला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर राहुल गायकवाड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 6:55 pm

Web Title: one killed one critically injured after trackter hits motorcycle in dhule
Next Stories
1 धुळ्यात मोबाईलवरुन एटीएम क्रमांक विचारुन ४० हजारांचा गंडा
2 दारुच्या नशेत बायकोला पेटवले; आई आणि मुलाला ठेचून मारले
3 भाजपच्या आयात उमेदवारांमुळे काँग्रेसला आव्हान
Just Now!
X