17 December 2018

News Flash

सोलापूरजवळ दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, तीन पोलीस जखमी

तीन जखमी पोलिसांवर उपचार सुरु

लोणावळ्याच्या भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तुंग किल्ल्यावर ट्रेंकिंग करत असताना सोळा वर्षीय मुलीचा खाली पडून मृत्यू झाला आहे.

सोलापुरातील खून आणि दरोड्यातील संशयित म्हणून पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात आबू पाशा कुरेशी या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मोहोळ भागात ही घटना घडली. जखमी पोलिसांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवेतालुक्यात घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन पथके तयार करून मोहोळ शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले.

या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले. तर रस्यावरून जाणारे आबू कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला. हल्ला करून संशयित दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले तर पळालेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

 

First Published on February 13, 2018 10:32 pm

Web Title: one killed three policemen injured in dacoity attack near solapur