महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढला. पोलिसांनी परिसराची पाहणी केली मात्र अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटवून देणारा कोणताही पुरावा पोलिसांना परिसरात आढळून आला नाही.
मागील काही वर्षांपासून खून करून मृतदेह आंबेनळी घाटातील जंगलात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.. या मृतदेहाचा एक हात तुटलेला असल्यामुळे याबाबत पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस अधिक माहिती घेत आहेत. या मृतदेहाची माहिती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली आहे. ही घटना रात्री आंबेनळी घाटातील कुंबळवणे(ता पोलादपूर) गावाजवळची आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.दरम्यान, मृत व्यक्तीचा एक हात कापलेला दिसत आहे. त्यामुळे हा खून आहे की आणखी काय याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामुळे घटनेने खळबळ उडाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 3:52 pm