लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८३ झाली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील १५ अहवाल नकारात्मक, तर एक अहवाल करोना सकारात्मक आला आहे. तसेच दोन अहवाल तपासणीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे.

आज आढळून आलेला करोनाबाधित रुग्ण मलकापूरमधील चैतन्य वाडी येथील रहिवासी ३८ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. जिल्ह्याात आतापर्यंत एकूण ८३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ५० जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयात ३० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ५४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण १४३० अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.आर. जी. पुरी यांनी दिली.