News Flash

गडचिरोलीत वाघाचा मृत्यू

वाघांच्या झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता...

गडचिरोलीत वाघाचा मृत्यू

सातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत आज संध्याकाळी एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ते ४ वर्षाचा असलेला हा नर वाघ दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाला असावा किंवा बिबट्याच्या झुंजीत मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त केली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी पोहचले आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका वाघाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर हा दुसरा मृत्यू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 9:25 pm

Web Title: one more tiger death in gadchiroli scj 81
Next Stories
1 पुरंदर तालुक्यात करोनाचे ३० रुग्ण, धोका वाढतोय
2 जेजुरीतील कडेपठारच्या डोंगरात रंगला गणपूजेचा आनंद सोहळा
3 लोणंदच्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव फेटाळला
Just Now!
X